बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण; भारतीय संघातील ‘हे’ तीन जण विलगीकरणात

मुंबई | सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना ओवलच्या मैदानात खेळवला जात आहे. आज या सामन्याचा चौथा दिवस आहे. आतापर्यंत या सामन्यात भारतीय संघाने 175 धावांची आघाडी मिळवली आहे. त्यातच आता या सामन्यावर कोरोनाचं सावटं पहायला मिळतंय.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता भारतीय संघाच्या तीन प्रशिक्षकांचं विलगीकरण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बीसीसीआयने स्वत: याची माहिती माध्यमांना दिली आहे.

भारतीय संघाचे गोलंदाज प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना विलगीकरण करण्याचा सल्ला वैद्यकीय टीमने दिला होता. त्यानंतर आता या तिघांना देखील विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, आगामी दौऱ्यात चारही प्रशिक्षक संघासोबत नसतील. त्यामुळे आता भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या प्रशिक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्यांना देखील विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“तो देश लुटायलाच आलाय, मी त्यांच्याबद्दल नाही, तर मनी हाईस्ट बद्दल बोलतीये”

पंजशीर खोऱ्यात रक्तपात, 600 तालिबानी यमसदनी, दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं!

“शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो”

बॅडमिंटनपटू कृष्णा नागरला सुवर्णपदक; भारताचं स्पर्धेतील 19 वं पदक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More