बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पुण्यामध्ये कोरोना लस घोटाळा; तब्बल इतक्या हजार लसी गायब

पुणे | पुण्यात आता नवा घोटाळा उघडकीस आला आहे. लसीकरण केंद्रांना करण्यात आलेला लस पुरवठा आणि प्रत्यक्षात झालेलं लसीकरण यांचा हिशेबच जुळत नाही. या हलगर्जीपणाला जबाबदार कोण  असा प्रश्न पडू लागलाय. तब्बल 44 हजार 944 लसी गेल्या कुठं? असा प्रश्न सध्या पुणे जिल्हा प्रशासनाला पडला आहे. गेल्या 16 जानेवारीपासून पुण्यात लसीकरणाला श्रीगणेशा झाला. त्यासाठी 1 लाख 8 हजार 556 लसींचा पुरवठा जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांना करण्यात आला होता.

पुणे जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड मिळून एकूण 208 लसीकरण केंद्रं आहेत. यांतील काही केंद्रांवर लसींचा साठा उपलब्ध असल्याचं शासनाच्या पोर्टलवर दिसत होतं. मात्र प्रत्यक्ष संपर्क साधला असता त्या ठिकाणी लसींचा साठा संपल्याचं सांगण्यात येत होतं. यातून लसींचा पुरवठा आणि प्रत्यक्ष लसीकरणांत घोळ झाल्याचं समोर आलं आहे.

काही खासगी लसीकरण केंद्रांनी पोर्टल वरील माहिती अद्यावत केली नाही. त्यामुळं हा गोंधळ झाल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. आरोग्य विभागाकडून झालेली चूक आता दुरुस्त करण्यात आली आहे. लसीकरणात कुठलाच गैरप्रकार झाला नसल्याचा दावा आता जिल्हा प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, पुण्यात आतापर्यंत 90 टक्क्यांपेक्षा जास्त पात्र लाभार्थींना लस देण्यात आलीय. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात पुण्याचा राज्यात दुसरा क्रमांक लागत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडं लसीकरणाबाबत तक्रारी सुरूच आहेत. यात समन्वय साधण्याची जबाबदारी आता जिल्हा प्रशासनाची आहे.

थोडक्यात बातम्या –

सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

ऐन निवडणुकीच्या तोंडावर केरळमध्ये काँग्रेसला धक्का; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत सामील!

सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ; तीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले!

पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केटमधील आगीत लाखोंचं नुकसान; कोंबड्या, बकऱ्या होरपळल्या!

संतापजनक! दारूच्या नशेत वडिलांनी केली जबरदस्ती; काँग्रेस पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More