मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केलं आहे. दाऊद इब्राहिम आणि मनी लाॅर्डिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीनं 3 मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. अशातच आता मलिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
नवाब मलिक यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा मलिकांच्या अडचणींत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. ईडीने मलिक यांना 23 फेब्रुवारीला मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर न्यायालयाने नवाब मलिक यांना सात मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावलेली. त्यानंतर आज मलिक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. नवाब मलिकांवर झालेल्या ईडी कारवाईनंतर विरोधकांनी मलिकांना चांगलंच निशाण्यावर घेतलेलं पहायला मिळत आहे.
दरम्यान, विरोधकांकडून नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अटकेत असलेला व्यक्ती मंत्रीपदावर कसा?, असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
‘…तर मी विधानसभेतच फाशी घेईल’; रवी राणा आक्रमक
“ED आणि BD ची तुम्ही चिंता करु नका, तुमच्या खाजगी कार्यक्रमाची CD निघाली तर…”
‘दाऊद के दलालों को, जुते मारो सालों को’, मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
“…तेव्हा आपले पंतप्रधान वाराणसीच्या गंगाकिनारी डमरू वाजवत होते”
तब्बल 6 वर्षांनी आर्ची आणि परश्यानं ‘तो’ सीन केला रिक्रिएट, पाहा भन्नाट व्हिडीओ
Comments are closed.