मुंबई | मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case)एनसीबीनं मोठा छापा टाकला होता. या छाप्यात अनेक मोठमोठ्या व्यक्तींना ताब्यात घेतलं होतं. यातच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही (Aryan Khan) ताब्यात घेण्यात आलं होतं. याप्रकरणात 28 ऑक्टोबर रोजी आर्यनची जामिनावर सुटका करण्यात आली. अशातच आता याप्रकरणी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे साईल यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे.
किरण गोसावीचा बाॅडीगार्ड प्रभाकर साईल यांनी किरणने आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटी रुपयांची डील केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यानंतर सर्वत्र एकत्र खळबळ उडाली होती. अशातच त्यांच्या मृत्यूनंही चांगलीच खळबळ उडाली आहे.
आज सकाळी 11 वाजता प्रभाकर साईलचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्याच्या घरी आणलं जाईल. तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
थोडक्यात बातम्या –
Gudi Padwa 2022 : 2 वर्षानंतर साजरा होणार निर्बंधमुक्त गुढीपाडवा
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
“राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी….”
“गृहखाते शिवसेनेकडे दिल्यास राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर कॅमेरे लावतील”
अभिनेत्री विशाखा सुभेदारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Comments are closed.