बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन सावंत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | राज्याच्या राजकारणात दररोज खळबळ माजवणारं काहीतरी घडत असतं. नुकतंच काॅंग्रेस प्रवक्ते पदाचा सचिन सावंत यांनी राजीनामा दिला होता. सचिन सावंत यांनी राजीनामा दिल्यानं सचिन सावंत कमालीचे नाराज असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत.

सचिन सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. परिणामी राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. सचिन सावंत यांनी कोणत्या कारणासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली ते अद्यापी स्पष्ट झालेलं नाही.

काॅंग्रेसमध्ये नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनेत बदल करण्यात आले आहेत. परिणामी या बदलात काॅंग्रेसनं मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची निवड केली होती. अगदी त्याचवेळी सचिन सावंत यांनी आपल्या पक्ष प्रवक्ते पदाचा राजीनामा दिल्यानं विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आता सचिन सावंत यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, सचिन सावंत यांनी काॅंग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणून गेली 10 वर्ष झालं काम केलं आहे. अडचणीच्या काळात पक्षासाठी भाजपला धारेवर धरणारा चेहरा म्हणून सचिन सावंत यांची ओळख होती. पण पक्ष सत्तेत आल्यावर त्यांना डावललं गेल्याचं बोललं जात आहे. अशातच आता त्यांच्या वर्षा बंगल्यावरील या भेटीनं राज्याच्या राजकारणात एक वेगळी चर्चा रंगली आहे.

थोडक्यात बातम्या 

राहुलचा धमाका, रोहितची तुफान खेळी; ऑस्ट्रेलियावर भारताचा 9 गडी राखून दणदणीत विजय

अन् नगरसेवकांच्या वादावरून नाना पटोले आणि अशोक चव्हाणांनी लावला डोक्याला हात

MPSC उमेदवारांना मोठा दिलासा! राज्यसेवा परीक्षेसाठी ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फाॅर्म

परमबीर सिंह बेपत्ता! उच्च न्यायालयात राज्य सरकारची धक्कादायक माहिती

‘इंदिरा गांधी प्रशिक्षण भवन’ पाडून आता ‘नरेंद्र मोदी प्रशिक्षण भवन’ बांधणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More