बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! अनिल देशमुखांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स

मुंबई | मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझेंना देशमुख यांनी हॉटेल, बार मालकांकडून 100 कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

सक्तवसुली संचलनालयानं अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले असून आज ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीच्या समन्सनुसार अनिल देशमुख आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.

अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल छापेमारी केली होती. देशमुख यांच्यावर झालेल्या वसुलींच्या आरोपांप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल जवळपास 9 तास चौकशी केली होती. अनिल देशमुख आणि काही इतर व्यक्तींच्या विरोधात ईडीनं गेल्याच महिन्यात मनी लाँड्रिंग कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयनं मुंबई हायकोर्टाच्या आदेशनुसार एका गुन्ह्याची नोंद करत सुरूवातीचा तपास केला होता. त्यानंतर ईडीनं गुन्हा नोंदवला.

अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना बेड्या ठोकल्या. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

विमानतळ नामकरण आंदोलन भोवलं; नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 20 हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल

“…अन्यथा येत्या आधिवेशात विधानसभेला घेराव घालू”

दिल्लीत तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झालीच नाही, पण… – शरद पवार

“देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर, राजीनामा दिला तरी मी भाजपतच राहणार”

“तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत होता तेव्हा मी रात्री जागून ऑक्सिजनची व्यवस्था करत होतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More