बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची कारवाई

जालना | गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agencies) महाराष्ट्रातील कारवायांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी महाविकास आघाडी (MVA Alliance) आणि भाजप (BJP) यांच्यातील संघर्षही वाढत चालला आहे. अशातच आता राज्याचे माजी मंत्री शिवसेनेचे दिग्गज नेते अर्जुन खोतकर (Shivsena Leader) यांच्या कार्यालयांवर ईडीनं छापेमारी केली आहे.

राज्यातील बड्या नेत्यांंवर कारवाईची मालिका सुरूच आहे. अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे मराठवाड्यातील दिग्गज नेते मानले जातात. परिणामी त्यांच्यावर कारवाईला राजकीय किनार असल्याची चर्चा सध्या राज्यात आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते.

अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील राहत्या घरासह नांदेड आणि औरंगाबाद येथील कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. सकाळपासूनच ईडीच्या पथकांनी अर्जुन खोतकर यांच्यावर कारवाईला सुरूवात केली आहे. अर्जुन खोतकर हे सध्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. परिणामी त्यांच्या बाजार समितीच्या आवारातील कार्यालयांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी औरंगाबाद येथे येऊन अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित कार्यालयांच्या माध्यमातून मोठा घोटाळा झाल्याचा खुलासा केला होता. अर्जुन खोतकर यांच्या कार्यालयांवर झालेल्या छापेमारीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे.

थोडक्यात बातम्या 

अण्णा हजारे यांच्या तब्येतीबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

नारायण राणेंच्या भविष्यवाणीची नाना पटोलेंकडून खिल्ली, म्हणाले…

“लवकरच महाराष्ट्रात बदल दिसेल, भाजपचं सरकार येणार”

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची सर्वत्र दहशत, केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

कोल्हापूरचा गडी बिनविरोध जिंकला! पाटील यांचा मार्ग मोकळा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More