बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार यांचं निधन

बंगळुरू | आपल्या सर्वांना धक्का बसणारी बातमी समोर येत आहे. आपल्या अभिनयानं सिनेजगतावर राज्य करणारा प्रसिद्ध आभिनेता पुनीत राजकुमार यांचं आज निधन झालं आहे. छातीत दुखत असल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डाॅक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर सुद्धा राजकुमार यांना वाचवण्यात यश मिळालं नाही. परिणामी या वृत्तानं त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

आज सकाळीच पुनीत यांना बंगळुरूच्या विक्रम हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डाॅक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत देखरेख ठेऊन होती. पुनीत यांना ह्रद्यविकाराचा झटका आल्यानं त्याचं निधन झालं आहे. काही वेळापुर्वी विक्रम हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांकडून 11.30 वाजता अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांच्याकडून उपचारासाठी स्वतंत्र टीम तयार केली जात असल्याचं सांगण्यात आलं होतं.

कन्नड सिनेमा सृष्टीतील प्रसिद्ध चेहरा म्हणून राजकुमार यांना ओळखलं जात होतं. अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठिशी होता. आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या जोरावर त्यांनी सिनेजगतावर राज्य केलं होतं.

दरम्यान, पुनित राजकुमार यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांनी ताबडतोब दवाखान्यात धाव घेतली होती. डाॅक्टरांच्या अथक परिश्रमानंतर सुद्धा त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. ह्रद्यविकारानं आपल्यातून अजून एक हरहुन्नरी कलाकार निघून गेला आहे.

थोडक्यता बातम्या

“राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, त्यामुळे….”

‘राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर प्रहार

अंड वापरा आणि केसांचं गळणं थांबवा, कसं ते जाणून घ्या

“आमच्याकडे अहो, मुन्नु, टुन्नु अशी हाक मारतात, मी पहिल्यांदाच ऐकलं की लाडाने दाऊदही म्हणतात”

ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने अनन्याच्या हातून बिग बजेट सिनेमे जाणार?

“…तर महाराष्ट्रात आगडोंब उसळेल आणि त्यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More