बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्याचा किटकनाशक घेत आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव | वादळी पावसामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सध्या अनेक बडे नेते दौरे करत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, आज फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

देवेंद्र फडणवीस आपल्या सहकाऱ्यांसोबत मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत होते. यावेळी फडणवीसांच्या ताफ्यासमोर एका शेतकऱ्याने किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी शेतकऱ्याच्या हातातील किटकनाशक औषध हिसकावून घेतलं. योगेश पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

योगेश पाटील यांची केळीची बाग आहे. वादळी पावसामुळे पाटील यांच्या केळीच्या बागेचं आतोनात नुकसान झालं आहे. नेत्यांचे दौरे हे फक्त फोटोसेशनसाठी असल्याचं पाटील यांचं म्हणनं आहे. पाटील यांचा यावेळचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये योगेश पाटील प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाचा हा दौरा फक्त फोटोसेशनसाठी काढला आहे. देवेंद्र फडणवीस फक्त रस्त्यावरील शेताचीच पाहणी करत आहेत, असे आरोप योगेश पाटील यांनी केले आहेत. दरम्यान, योगेश पाटील यांच्या अगोदर परिवर्तन चौकात देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांचा ताफा अडवला होता.

थोडक्यात बातम्या –

आठवड्यापूर्वीच कोरोनावर मात केलेले ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचं दुःखद निधन

अँजिओप्लास्टीसोबत शुगर-बीपी, खासगी रुग्णालयाने हात झटकले, मात्र सरकारी रुग्णालयाने आजीला वाचवले!

धक्कादायक! संतापलेल्या पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ठोकला खिळा अन्…

WHOने भारतात सापडलेल्या नवीन कोरोना व्हेरियंटला दिली ‘ही’ नावे

शेवटी बाप तो बापच पोराच्या जीवासाठी तब्बल 300 किमीचा सायकलवर प्रवास; डाॅक्टर म्हणाले होते…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More