मुंबई | आज सकाळपासून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिकांची चौकशी सुरू आहे. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
ईडीनं सकाळ सकाळ मलिकांच्या घरी हजेरी लावली. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच पेटल्याचं पहायला मिळालं. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोपांची मालिका सुरु झाली. अद्यापही आरोपांची मालिका सुरुच आहे.
नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवरुन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहून ईडी कार्यालयासमोर पोलिसांचा ताफा वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, कुठलीही नोटीस न बजावता मलिकांना ताब्यात घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
“नवाब मलिकांची राज्य मंत्रिमंडळातून हकलपट्टी करायला लावणार”
“वुहानच्या ज्या प्रयोगशाळेत कोरोना सापडला त्याचा मालक बिल गेट्स”
“नवाब मलिकांचा अनिल देशमुख होऊ देऊ नका”
‘युवराजांना पेंग्विन म्हणताना…’, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
नवाब मलिकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन
Comments are closed.