बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! अखेर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यास मान्यता दिल्यानंतर अखेर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले असून उद्धव ठाकरे यांच्याकडे ते राजीनामा देणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची माहिती दिली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी आज एक बैठक पार पडली.

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत, सीबीआय चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नाही. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनामा घेण्यात यावा असा निर्णय झाला आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. गृहमंत्रीपद आता कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून आरोपाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयातने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या पारड्यात टाकले.

त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी  . अॅड. जयश्री पाटील यांनी चौकशी सीबीआयला द्यावी अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

तरुणींनी बाल्कनीत दिले न्यूड पोज, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडुन ‘ही’ कारवाई, पाहा व्हिडीओ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल खेळाडूंसाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; राबवणार ‘ही’ मोहिम

फेक फिल्डिंगमुळे पाकिस्तानचा फखर जमान द्विशतकाच्या तोंडावर आऊट, मुंबई इंडियन्ससच्या खेळाडूला शिक्षा

इरा नाही तर ‘हे’ आहे आमिर खानच्या मुलीचं खरं नाव; चुकीचं नाव उच्चारल्यास आता 5 हजारांचा दंड

“मला कोहली आणि रोहितकडून फटकेबाजी शिकायचीय”; भारतीय संघातील ‘या’ मोठ्या खेळाडूचं वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More