बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

11वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू, वाचा सविस्तर

मुंबई | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनावरून जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर अकरावीचे प्रवेश कसे होणार याची सर्वांनाच चिंता लागून होती. मात्र, अकरावी प्रवेशासाठी सीईटी द्यावी लागेल, असं राज्य सरकारने स्पष्ट केलं होतं. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय धूळीस मिळवत अखेर प्रवेश परीक्षा रद्द केली. त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेश परीक्षेला आजपासून सुरूवात झाली आहे.

सीईटी रद्द झाल्यानंतर आता शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक आणि अमरावती या 5 मनपा क्षेत्रातील अकरावीचे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत. यासाठी वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे. उर्वरित राज्यात परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने अर्ज मागवले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आजपासून या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होत असून येत्या 17 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरायचा आहे. अर्जाचा भाग 1 भरल्यानंतर विद्यार्थ्यांना फाॅर्म व्हेरिफिकेशनसाठी जवळच्या महाविद्यालयात जावं लागेल आणि फाॅर्म व्हेरिफाय करावा लागेल. 17 ऑगस्टला विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय निवडावे लागणार आहे. तो अर्जाचा भाग 2 असेल. त्यात विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडसाठी ऑप्शन फाॅर्म भरायचा आहे.

दरम्यान, 17 ते 22 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरता येईल. त्यानंतर 27 ऑगस्टला तारखेला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. 27 ते 30 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयाची निवड करावी लागेल. मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा की नाही, हे विद्यार्थ्यांना ठरवल्यानंतर पुढील दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रक्रिया पुर्ण करावी लागणार आहे. त्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांन सांगितलं आहे.

पाहा पुर्ण वेळापत्रक –

थोडक्यात बातम्या-‘तुम्ही विचार स्वातंत्र्यावर निर्बंध कसं घालू शकता?’; उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं

…नाहीतर पीएफ खात्यातून ऑनलाईन पैसे काढता येणार नाहीत, जाणून घ्या अधिक माहिती

संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?; ‘त्या’ प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार

दिया मिर्झानं पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा फोटो!

न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयानंतर राज्यपालांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More