बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मोदी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली | मागील काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला असताना शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. तर दुसरीकडे खतांच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी अडचणी आल्या होत्या. अशातच आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

रब्बी हंगामात युरियाच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. तर पुरवढ्यामध्ये घट झाल्याचं देखील दिसून आलं होतं. अशातच केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

देशातील अनेक राज्यांमधून खताची कमतरता असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. एप्रिल ते जुलै या तीन महिन्याच्या कालावधीत चीनकडून 10 लाख टन युरिया आयात करण्यात आला होता. आता तो अंतर्गत बाजारपेठेत पाढवला जाणार आहे.

दरम्यान, एकूण खतांच्या वापरांपैकी युरियाचा सर्वात जास्त वापर केला जातो. युरियाचा वापर हा तब्बल 55 टक्के इतका आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मागणी वाढल्यामुळे खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

बापानं केलं असं काही की, अरबाज मर्चंटने मारला डोक्यावर हात; पाहा व्हिडीओ

…अन् राज्यपाल म्हणाले,”मी आजच्या आज राजीनामा देतो”

‘बिग बुल’ झुनझुनवालांना जोर का झटका! झालं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी

आत्ताची सर्वात मोठी बातमी! राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More