गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर!

मुंबई | सध्या लावणी(Lavani) म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर येतं ते म्हणजे गौतमी पाटीलचं(Gautami Patil). गौतमी पाटील आणि तूफान गर्दी हे समीकरण आता सगळ्यांनाच ठाऊक झालं आहे.

आपल्या नृत्याच्या जोरावर गौतमी यशाच्या शिखरावर पोहचली असली तरी तिला विरोध करणाऱ्यांची संख्या कमी नाही. गौतमीच्या लावणीत अश्लिलता आहे, असं म्हणत अनेक कलाकारांनी आणि संघटनांनी तिच्या लावणीवर बंदी घालावी अशी मागणी केली होती.

गौतमीच्या लावणीवर बंदी घालावी की नाही हा वाद चर्चेत असतानाच गौतमीच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. त्यामुळं तिचे चाहते प्रचंड खुश आहेत.

काही दिवसांपूर्वी गौतमीनं सांगितलं होतं की तिचं नवीन गाणं येणार आहे. तेव्हापासून तिच्या चाहत्यांना या गाण्याची प्रतिक्षा होती. आता चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली आहे.

गौतमीचं नुकतंच एक नवीन गाणं रिलीज झालं आहे. ‘मी करते मुजरा तुम्हाला’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला अल्पावधीतच प्रचंड लाईक्स मिळाले आहे. या गाण्यात गौतमीला पाहून कोणीही तिचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, असं काहींचं मत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-