बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

MPSCच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी; अखेर परीक्षेची तारीख ठरली

मुंबई | गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. तसेच एमपीएससीतून पदे मिळवलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्याप नियुक्त्या देखील देण्यात आल्या नाहीत. यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक झालेले पहायला मिळत होते. त्यातच आता एमपीएससी उमेदवारांना आयोगाने दिलासा दिला आहे.

11 एप्रिल रोजी एमपीएससीची परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु सरकारने कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर परीक्षा होणार नसल्याचं सांगितलं होतं. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा परीक्षेच्या दोन दिवसाआधी सरकारने केली होती. त्यानंतर उमेदवारांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

येत्या 4 सप्टेंबरला संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. बरोबर एक महिन्याआधी आयोगानं परीक्षेच्या तारखा जाहीर केल्यानं आता उमेदवारांना देखील अभ्यासाला वेळ मिळणार आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जातील, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, या नियुक्त्या अद्याप झाल्या नाहीत. एमपीएससीच्या सदस्य नियुक्तीचा प्रश्न आता राज्यपालांच्या पारड्यात गेला आहे.

पाहा पत्र-

227329932 997284947742093 5747938680564486817 n

थोडक्यात बातम्या-

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी गहना वशिष्टला कोर्टाकडून आणखी एक झटका!

मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणात एनआयएचा धक्कादायक दावा!

शिल्पा शेट्टीला अभिनेता आर. माधवनचा पाठिंबा, म्हणाला…

“अमित शहा संसदेत आले, तर मी टक्कल करेन आणि तुमच्या कार्यक्रमात येईल”

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाचा राज्यांना सतर्कतेचा इशारा, म्हणाले…

यो यो हनी सिंगच्या अडचणीत वाढ; पत्नीनं दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More