बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे जमा होणार

मुंबई | काही दिवसांपूर्वी इपीएफओने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खातेदारांसाठी सुचना जाहीर केल्या होत्या. त्यानुसार खातेधारकांना आपल्या पीएफ अकाऊंटला आधार लिंक करणं गरजेचं असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर लवकरच खात्यात पैसे जमा होतील, अशी अपेक्षा खातदारांना होेती. त्यानंतर आता पीएफ खातेदारांसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.

इपीएफओ लवकरच खातेदारांच्या खात्यात भविष्य निर्वाह निधी व्याज जमा करणार आहे. सुमारे 6 कोटी नागरिकांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत. इपीएफओने ट्विट करत याची माहिती दिली आहे. जेव्हा व्याज जमा केलं जाईल, तेव्हा त्याची भरपाई केली जाईल. त्यामुळे व्याजाचे नुकसान होणार नाही. इपीएफओ लवकरच 8.5 टक्के व्याज जमा करू शकतो, असं ट्विट इपीएफओने केलं आहे.

सेवानिवृत्त निधी नियामक मंडळाने 2020-21 च्या आर्थिक वर्षात इपीएफओ व्याजदर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीच्या उद्रेकानंतर सरकारने व्याजदर खाली आणला होता. गेल्या 7 वर्षात सर्वाधिक खाली असलेला 8.5 टक्के व्याजदर देण्यात आला होता. त्यानंतर आता खातेदारांना पुन्हा त्या व्याजदरात पैसे मिळणार आहे.

दरम्यान, इपीएफओने पीएफ खातेदारांसाठी नाॅमिनी असणं अनिवार्य केलं होतं. त्यामुळे खातेदाराचा मृत्यू झाल्यास नाॅमिनीला निधी दिला जाऊ शकतो. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे खातेदारांना हा फाॅर्म भरता येऊ शकतो. तर ज्याचं आधार खात्याला लिंक केलेलं नाही त्यांना देखील लिंक करण्याचं आवाहन केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

‘लोकशाहीच्या मंदिरात मार्शल लाॅ लावलाय’; राज्यसभेच्या गदारोळानंतर राऊतांची टीका

‘मुख्यमंत्री तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

संभाजीराजेंना बोलू न दिल्यानं संजय राऊत भडकले, पाहा व्हिडीओ

“मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही ते सांगा”

हिमाचल प्रदेशातील नॅशनल हायवेवर दरड कोसळली; धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More