बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे येणार

नवी दिल्ली | कोरोना काळात भारतासोबतच जगभरात अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. त्यामुळे कोरोनाच्या काळात 2019-20 या आर्थिक वर्षात पीपीएफ व्याजदर कमी करण्यात आला होता. हा व्याजदर 8.5 टक्क्यांवर आणण्यात आला होता. गेल्या 7 वर्षात हा सर्वात कमी व्याजदर होता. त्याआधी देखील दोन वर्ष हा व्याजदर त्याच स्तरावर ठेवण्यात आला होता. त्यातच आता पीपीएफ खातेदारांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे.

ईपीएफओमध्ये व्याज लवकरच भविष्य निर्माण निधी संघटनेच्या ईपीएफओ ग्राहकांना पाठवले जाण्याची शक्यता आहे. सरकार यावर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या महिन्याच्या अखेर ग्राहकांना ही भेट मिळू शकणार आहे. ग्राहकांना मिळणारे हे व्याज चालू आर्थिक वर्षाच्या 8.5% नुसार मिळणार आहे. रिटायरमेंट फंड नियामक मंडळाने संपूर्ण आर्थिक वर्षात ठेवींपेक्षा जास्त रक्कम काढल्यामुळे आर्थिक वर्ष 2020-21 साठी ईपीएफ व्याज दर कायम ठेवलेला नाही.

कोरोना काळात सरकारने पीएफ खात्याच्या नियमात बदल केले होते. आता ईपीएफओकडून व्याजाची रक्कम पाठवून सुमारे 6 कोटी ईपीएफओ ग्राहकांना लाभ मिळणार आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या संकटात आल्या होत्या. त्यामुळे सरकाने ईपीएफओच्या माध्यमातून ग्राहकांना पैसे उपलब्ध करून दिले होते.

दरम्यान, सरकारने आता पीएफ खातं आधारसह लिंक करण्यास सांगितलं होतं. खातं आधारसह लिंक न केल्यास कंपनीकडून रक्कम खात्यात जमा होणार नाहीत. त्यामुळे पीएफधारकांनी लवकरात लवकर खातं आधारसह जोडून घ्यावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे. त्यामुळे नागिरकांना पैसे काढण्यास अडचणी तयार होणार नाही.

थोडक्यात बातम्या-

“आता प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं”

भविष्यात कोरोनाचे आणखी व्हेरिएंट येण्याची शक्यता, त्यामुळे…- डॉ. रणदीप गुलेरिया

मुख्यमंत्री आज सातारा दौऱ्यावर; पुरग्रस्त भागाची पाहणी करणार

काही सेकंदातच लोखंडी पूल उद्ध्वस्त झाला; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर

“भास्कर जाधव हे तमाशातील सोगांड्या आणि दशावतारातील शंकासूरच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More