बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वात मोठी बातमी! माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या जीवाला मोठा धोका

नवी दिल्ली | भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) सध्या अडचणींत सापडला आहे. गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे एकच खळबळ पहायला मिळत आहे.

गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी मिळताच त्यानं दिल्ली पोलीसात मंगळवारी रात्री तक्रार दाखल केली आहे. गौतम गंभीरच्या तक्रारीनुसार त्याला आयएसआयएसकडून (ISIS) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

गौतम गंभीर यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इसिस काश्मीरने फोन आणि ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गौतम गंभीर यांच्याकडून करण्यात आला आहे, असं डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान (DCP Shweta Chauvhan) यांनी सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्ली सरकारच्या औषध महानियंत्रकांनी गौतम गंभीर फाऊंडेशन कोविड 19 औषधांची अवैध साठेबाजी आणि वितरण प्रकरणात दोषी आढळल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ झाली होती. अशातच पुन्हा एकदा गंभीरच्या अडचणी वाढल्या आहेत.

थोडक्यात बातम्या –  

“ड्रग्ज अल्प प्रमाणात बाळगल्यावर गुन्हा मानला जाणार नाही”

तुमच्या कार्यक्रमांवर आता महापालिका ठेवणार वॉच; गर्दी आढळून आली तर…

“सर्व कर्जबुडव्यांचा शोध घेतला जाईल आणि आपल्या देशाचा पैसा परत आणला जाईल”

मोठी बातमी! देशातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय मोठी घट

कोरोनानं टेंशन वाढवलं; WHO कडून ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More