बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्स रूग्णालयात दाखल

नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत बिघडल्याची माहीती समोर येत आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनमोहन सिंग सध्या 89 वर्षाचे आहेत. परिणामी त्यांची तब्येत खालावल्यानं त्यांना तात्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.

मनमोहन सिंग यांना ताप आणि कोविडच्या त्रासामुळं रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता मनमोहन सिंग यांना छातीत त्रास होत असल्यानं त्यांना उपचारासाठी भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आलं आहे. मनमोहन सिंग यांच्यावरील उपचारासाठी एम्समध्ये एका विशेष टीमकडून उपचार सुरू आहेत.

एम्सचे डाॅक्टर रणदिप गुलेरिया हे मनमोहन सिंग यांच्यावरील उपचार करणाऱ्या टीमचे प्रमुख आहेत. काॅंग्रेस सचिव प्रणव झा यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मनमोहन सिंग यांची तब्येत ठीक असून त्यांच्यावर नियमित उपचार चालू आहेत, असं प्रणव झा म्हणाले आहेत. सर्वजण मनमोहन सिंग यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर 2009 साली बायपास सर्जरी करण्यात आली होती. 19 एप्रिल रोजी मनमोहन सिंग कोरोना पाॅझिटिव्ह आले होते, त्यातून ते सध्या बरे झाले आहेत. पण अचानक छातीच्या त्रासामुळं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनमोहन सिंग यांची गणना जगातील महान अर्थशास्त्रज्ञांमध्ये होते.

थोडक्यात बातम्या 

“सात दिवस झालं टोटल सुरु मात्र हिशोब लागत नाहीये”

‘त्या रात्री आर्यन क्रुझवर उपस्थित नव्हताच’; आर्यनच्या वकिलांचा खळबळजनक दावा

“जिल्ह्याची संस्कृती बिघडवू नका”, त्या’ प्रकरणावरुन पंकजा मुंडेंचा थेट निशाणा

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला का जात नाहीत?; समोर आलं ‘हे’ कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More