“The Kashmir Files टॅक्स फ्री करण्यापेक्षा Youtube वर टाका”
नवी दिल्ली | सध्या देशात ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) वरून जोरदार राजकारण पेटल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये शाब्दिक युद्ध देखील रंगलं आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि कमाईच्या आकड्यावरून देखील हा चित्रपट चर्चेत आहे.
विधानसभेत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावं लागतं, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्ष त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलं नाही, अशा शब्दांत केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच The Kashmir Files टॅक्स फ्री करण्यापेक्षा Youtube वर टाका, असं त्यांनी म्हटलंय.
दिल्लीमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाला करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर अरविंद केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत भाजपवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, विवेक अग्निहोत्रींना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यावरूनही मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यावरून विरोधक केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत.
थोडक्यात बातम्या-
परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका
“कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याची योजना होती”
नितीन गडकरींच्या घोषणेनंतर पुण्यातील ‘हे’ दोन टोलनाके बंद होणार
“रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांची भेट घेणार”
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा पेनड्राईव्ह बॉम्ब, म्हणाले…
Comments are closed.