बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या सुरक्षेत मोठी वाढ

मुंबई | सध्या राज्यात एनसीबी आणि एनसीपी यांच्यात वाद रंगला आहे. मुंबईमधील एका क्रुझवर कारवाई करत एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई केली होती. एनसीबीनं या कारवाईत सिनेअभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. एनसीबीची संपूर्ण कारवाई बनावटी असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली होती. अशातच आता नवाब मलिक यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाचं सुद्धा ड्रग्ज प्रकरणात नाव येत आहे. सर्व आरोप फेटाळून लावत नवाब मलिक यांनी एनसीबीवर जोरदार हल्ला चढवला आहे. नवाब मलिक यांना सतत धमक्यांचे फोन, मॅसेज येत आहेत, असं ते म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवाब मलिक यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवाब मलिक यांच्या सुरक्षेत अगोदर फक्त एक पोलीस तैनात होता. पण एनसीबी आणि भाजपवर नवाब मलिक सतत आरोप करत आहेत. परिणामी त्यांना सुरक्षेची गरज असल्यानं सरकारनं 4 शस्त्रधारी जवान सुरक्षेत तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सुरक्षेत एक पायलट कार आणि घरी चार जवानांचा पहारा असणार आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच नावही ड्रग्ज प्रकरणात आलं होत. या प्रकरणी सर्व आरोप नवाब मलिक यांनी फेटाळून लावले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेतही वाढ केली होती.

थोडक्यात बातम्या 

‘बास झालं राजकारण, हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं…’; उदयनराजेंचं खुलं आव्हान

“चित्रा वाघ कोणत्या मनोवृत्तीच्या आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय”

‘शरद पवारांना पंतप्रधान पद मिळालं नाही म्हणून…’; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

…म्हणून मी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली; हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा

‘आपण फक्त टगे पोसतोय, हे त्यांना समजलं पाहिजे’; प्रीतम मुंडेंचा घणाघात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More