मोठी बातमी! सापळा रचून पोलिसांकडून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

अहमदनगर | शिर्डी (Shirdi) तील अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क देहव्यापार सुरू असल्याचं उघड झालं आहे. शिर्डीतील हायफाय सेक्स रॅकेट (Sex Racket)चा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांना टिप मिळाली आणि मोठं रॅकेट उघड झालं आहे.

शिर्डीत काही हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची टिप पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या 6 हॉटेलवर एकाचवेळी छापे मारले.

छाप्यांमुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांपासून ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. काही जण हॉटेलमधून पळण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं. 

श्रीरामपूरचे विभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली. श्रीरामपूर पोलिसांच्या या कारवायांमुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचे आणि हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी सापळा रचून शिर्डीतील सहा हॉटेलवर एकाच वेळी छापा मारल्याचं वृत्त आल्याने या हॉटेलभोवती बघ्यांनी गर्दीही केली होती.

महत्वाच्या बातम्या-