नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन वादानंतर आणि आता राज्यातील विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर मार्केटवर झालेला पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज बघायला मिळणार आहे. यापूर्वीच निवडणुकीचा परिणाम पहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दिवशी सेन्सेक्स एक हजार अंकानी वधारला असून निफ्टी देखील 321 अंकांनी वर आहे. विधानसभा निवडणुकीचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसत आहे. बाजाराच्या सुरूवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी दोन टक्क्यांहून अधिक व्यापार करत होते.
BSE सेनेक्स 1100 अंकांनी व 2.04 टक्क्यांनी वाढून 55800 वर व्यापार करत आहे. निफ्टी 500 अंकांनी वाढून 16757 वर पोहोचला आहे. निफ्टीच्या नेतृत्वात 3.6 टक्क्यांनी वाढ झालेली बघायला मिळालं. निफ्टी ऑटो 3.15 यांनी वाढला आहे. कच्च्या तेलाचे भाव 111 डॉलर्सवर आल्यानं जागतिक बाजारात उत्साह कायम आहे.
दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, बजाज फायनान्स सेन्सेक्समध्ये आघाडीवर आहेत.
थोडक्यात बातम्या –
‘उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
पंजाबमध्ये सत्तापरिवर्तन; आपकडून काँग्रेसचा सुपडा साफ
“येत्या काही दिवसांत अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील”
“पदरात काहीच नाही, तरीही 2024 मध्ये पंतप्रधान त्यांचाच”
सर्वात मोठी बातमी! पणजी मतदार संघातून उत्पल पर्रीकर यांचा पराभव
Comments are closed.