बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी ! राणा दाम्पत्यांविषयी महत्त्वाची माहिती आली समोर

मुंबई | खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana)यांच्यावरुन राज्यात सध्या जोरदार गोंधळ उडाला आहे. राणा दाम्पत्यांवरुन आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगला आहे. अशातच राणा दाम्पत्यांविषयी महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर आज होणारी सुनावणी उद्यावर ढकलली आहे. त्यामुळे आजही राणा दाम्पत्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे जामीन अर्जावर उद्या सुनावणी होईल.

उद्या दुपारी 3 वाजता राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. न्यायालयाने आधीच स्पष्ट केलं होतं की, शुक्रवारी शक्य झालं तर सुनावणी घेण्यात येईल. मात्र, न्यायालयात आधीच अनेक प्रकरणांची सुनावणी आहे. त्यामुळे आज सुनावणी रद्द करण्यात आली.

दरम्यान, खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) सध्या न्यायलयीन कोठडीत असून दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. कोठडीत असूनही राणा दाम्पत्य सरकारवर गंभीर आरोप करत असलेले पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“कोणी योगी, कोणी भोगी तर कोणी मानसिक रोगी”

मोठी बातमी! पुणेकरांना झटका, सीएनजीचे दर तिसऱ्यांदा महागले

रशिया-युक्रेन युद्धाचा तळीरामांना असाही फटका, महत्त्वाची माहिती समोर

“राणे, सोमय्या, कंगना रनौतच्या पंक्तीत आता राणाही बसतील”

मोठी बातमी! हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी उचललं ‘हे’ पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More