बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

मुंबई | राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रोज पहायला मिळतात. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळातील वातावरण तापलेलं पहायला मिळत आहे. अशातच महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून आणि भाजप विरोधी पक्षांत गेल्यापासून राजकारण सूडबुद्धीनं चालल्याचं पहायला मिळत आहे.

विरोधक रोज कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतात. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार असून अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याची माहिती समोर आली नाही. त्यामुळे सध्या सगळ्याचं लक्ष 5 वाजता होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीकडे लागलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

…तर कुणीही सहजपणे तुमच्या प्रेेमात पडेस, तज्ज्ञांनी सांगितली ट्रीक

“महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमतानं सरकार आणणार”

मोठी बातमी! राज्यपालांनी ठाकरे सरकारनं घेतलेला ‘तो’ निर्णय केला रद्द

उष्णतेचा वाढता पारा पाहून हवामान खात्यानं दिला ‘हा’ गंभीर इशारा, म्हणाले…

“इतकं क्रूर पद्धतीचं, अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केलं नव्हतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More