बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! राज्यातील निर्बंधांबाबत महत्वाची अपडेट, वाचा सविस्तर

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागु करण्यात आले आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात आला असताना निर्बंध पुन्हा एकदा शिथील होणार का?, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज महाराष्ट्रातील टास्क फोर्ससह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

महाराष्ट्रात सध्या सर्व दुकानं ही संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली असून आणखी काही निर्बंध लागु करण्यात आले आहेत. आता महाराष्ट्रातील निर्बंध हटवण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच मुंबई लोकलही सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

आज होणाऱ्या टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री राज्यातील निर्बंधांबाबत व मुंबई लोकल सुरू करण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील निर्बध शिथील करण्याबाबत सकारात्मक विचार करून निर्बंध हटवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभुमीवर कोरोना रूग्णांची संख्या महाराष्ट्रात अचानक वाढु लागली होती. आता महाराष्ट्रातील रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात आल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

मुंबई लोकल सामान्यांसाठी सुरू होणार?, राजेश टोपेंचं सुचक वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींची टि्वटरवर कमाल; फॉलोअर्सची संख्या 7 कोटींवर

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबईकरांनी करुन दाखवलं! आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More