गोल्डमॅन दत्ता फुगे प्रकरण; सात वर्षांनंतरही त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पुण्यातील गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले दत्ता फुगे (Datta Fuge) यांची 2016 साली हत्या करण्यात आली होती. दत्ता फुगे 2012 मध्ये प्रसिद्धीझोतात आले होते.  तब्बल दीड कोटी रुपयांचा सोन्याचा शर्ट त्यांनी बनवला होता. पण या शर्टमुळे त्यांचीच हत्या झाल्याचं बोललं जातंय.

पुण्यात दिघी येथील भारतमाता नगर परिसरात 15 जुलै 2016 रोजी रात्री उशिरा दगडाने ठेचून फुगेंची हत्या करण्यात आली होती.

जवळपास 20 बॉडीगार्डच्या गराड्यात राहणारे फुगे त्यावेळी एकटेच होते. दत्ता फुगेंचा मुलगा शुभम याने वडिलांच्या मारेकऱ्यांना पाहिलं होतं. या प्रकरणात पाच जणांना अटक झाली.

हत्येनंतर आरोपींनी त्यांच्या गळ्यातील एक किलो वजनाची सोन्याची चेन आणि त्यांचा मोबाईल घेऊन पोबारा केला होता. शुभमने आरोपींची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना लगेच अटक केली होती.

दरम्यान, दीड कोटींचा शर्टसाठी गोल्डमॅनची हत्या झाली. परंतु हा शर्ट आरोपींना मिळालाच नाही. कारण तो शर्ट घालून गोल्टमॅन दत्ता फुगे वाढदिवसाच्या पार्टीत गेले नव्हते. ते साध्या कापड्यांमध्येच गेले होते. परंतु त्या शर्टचा शोध पोलीसही घेऊ शकले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-