Maharashtra politics | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (Maharashtra politics) निकाल जाहीर केलाय. त्यानंतर ठाकरे गट त्यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात गेलं आहे. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यात सर्वोच्च न्यायालयाने 40 आमदारांना नोटीस जारी केलीये.
सर्वोच्च न्यायालयाची 40 आमदारांना नोटीस
सुप्रीम कोर्टाने सर्व आमदारांना आपलं म्हणणं सादर करण्याची नोटीस जारी केली आहे. सुप्रीम कोर्ट त्यांची बाजू ऐकून घेणार आहे. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात पाठवावे किंवा हायकोर्टातील प्रकरण सुप्रीम कोर्टात घ्यावं यावर निर्णय होईल.
Maharashtra politics| नार्वेकरांचा निकाल अडचणीत येणार?
सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, तुम्ही उच्च न्यायालयातच जा. पण यासाठी बराच अवधी लागेल, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला नोटीस जारी करत असल्याचं म्हटलं.
आता या प्रकरणावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होईल. तारीख नंतर कळणार असली तरीही फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं वकिल सिदार्थ शिंदे यांनी म्हटलं.
ठाकरे गटाने याबाबतचा निकाल घ्यावा, या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आता याप्रकरणी सुप्रीम कोर्ट दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून काय निकाल देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटातील आमदाराला अपात्र केलं नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंना नोटीस जारी केली असल्यामुळे राहुल नार्वेकरांचा निकाल अडचणीत तर नाही ना येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Congress | मोठी बातमी! काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता तडकाफडकी निलंबित
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खान अचानक रूग्णालयात अॅडमिट; चाहते चिंतेत, नेमकं काय झालं?
Bigg Boss 17 | ‘बिग बॉस’च्या फिनालेपूर्वी अंकिता लोखंडेला मोठा धक्का!
Shailesh Lodha | राम मंदिरावर शैलेश लोढांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Ayodhya Ram Mandir | कोणी लाख तर कोणी कोटी रूपये, राम मंदिर उभारणीसाठी ‘या’ कलाकारांनीही केलंय दान