बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! संजय राठोडांना दिलासा; ‘त्या’ प्रकरणात मिळाली क्लिन चीट

यवतमाळ | शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे करण्यात आली होती. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. एका महिलेनं संजय राठोड यांच्यावर शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात केली होती. या महिलेनं पोस्ट पाठवून ही तक्रार केली होती. त्यानंतर संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती.

महिलेने केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. पोलीस तपासात कोणतंही तथ्य समोर आलं नाही. त्यामुळे संजय राठोड यांना क्लिन चीट देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. संजय राठोड यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणात एसआयटीने चौकशी पुर्ण केली. यात संजय राठोड यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता.

या प्रकरणात आरोपी महिलेचा जबाब नोंदवण्यात आला. अर्जातील नमूद करत या विषयाच्या बाबी या संपूर्णपणे खोट्या व निराधार असल्याचे निष्पन्न झालंय, त्यामुळे संजय राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्यता नसल्यानं त्यांना अखेर क्लिन चीट देण्यात आली आहे. यवतमाळचे पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

दरम्यान, पत्रकार परिषद घेताना खुद्द संजय राठोड यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. राजकारणात विरोध केल्यानं माझ्यावर हे आरोप होत आहेत. माझं राजकारण संपवण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप संजय राठोड यांनी केला होता.

थोडक्यात बातम्या-

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

जेतेपदावर नाव कोरण्यासाठी कोहलीचा नवीन डाव?, संघात केले ‘हे’ मोठे बदल

‘गुन्हा दाखल करायचा असेल तर…’; खासदार संभाजीराजे भोसले कडाडले

शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला भाजपमध्ये येण्यास नारायण राणेंची खुली ऑफर

राहुल गांधी म्हणजे देवाला सोडलेलं जनावर- रावसाहेब दानवे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More