मोठी बातमी! बीबीसीच्या ऑफीसवर आयकर विभागाचा छापा

नवी दिल्ली | दिल्लीतील बीबीसी वृत्तसंस्थेच्या(BBC) ऑफीसवर आयकर विभागानं(Income Tax Department) छापा टाकला आहे. यावेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केले आहेत.

दिल्लीतील बीबीसीच्या ऑफीसनंतर आता मुंबईतील बीबीसीच्या ऑफीसवरही आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या छापेमारीमध्ये 50 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.

आयकर विभागाने बीबीसीच्या ऑफीसवर छापा टाकल्यानंतर काॅंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सूड भावनेने बीबीसीच्या कार्यालयावर ही कारवाई झाल्याचे जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीबीसीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त डाॅक्युमेंट्री(BBC Documentary On PM Narendra Modi) प्रदर्शित केली होती. या डाॅक्युमेंट्रीला केंद्र सरकारनं विरोध केला होता.

या डाॅक्युमेंट्रीच्या वादात अनेकांनी बीबीसीवर भारतात बंदी घालावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता लगेचच बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकल्याने विविध चर्चांणा उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More