मुंबई | आयकर विभागाने (Income Tax Department) गेल्या काही दिवसांपासून धाडसत्र सुरू केलं आहे. आयकर विभागाने आतापर्यंत एकापाठोपाठ एक अशा अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. आयकर विभागाकडून मुंबई, ठाणे, बंगळुरूसह देशातील 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
देशातील नामांकित असलेल्या हिरानंदानी ग्रुपवर (Hiranandani Group) आयकर विभगाने छापा टाकला असल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. हिरानंदानी ग्रुपने रियल इस्टेटमध्ये काळा पैसा गुंतवला असल्याचा आयकर विभागाला संशय आहे.
आयकर विभागाने हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्याने बांधकाम विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. कोट्यवधी रूपयांच्या कर चोरी प्रकरणी आयकर विभागाने आज ही कारवाई केली आहे.
दरम्यान, आयकर विभागाने आज सकाळपासून देशभर कारवाईचा सपाटा लावला आहे. आयकर विभागाने देशातील 25 ठिकाणी छापेमारी केली. नामांकित हिरांनंदानी ग्रुपवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली.
थोडक्यात बातम्या-
“ज्यांचा आदर्श दाऊद आहे त्या मटण करींना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही”
महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेल पाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडर महागलं
कोरोना व्हायरसबद्दल तज्ज्ञांनी केलेल्या धक्कादायक दाव्याने खळबळ
मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर
“वहिनीसाहेबांचा आग्रह असेल तर तो आग्रह आम्ही पाळू”
Comments are closed.