बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलला मिळाले 2 नवे संघ! आयपीएल इतिहासातील विक्रमी बोली लागली

मुंबई | क्रिकेटमध्ये टी-20 फाॅरमॅट आल्यानंतर क्रिकेटचं रंगरूपचं बदललं. गेल्या 14 वर्षात भारतात आयपीएल खूप गाजली. भारतीयांनी आयपीएलला भरभरून प्रेम दिलं. क्रिकेटप्रेमींच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आयपीएलने देखील वेगवेगळ्या हंगामात नवनवीन बदल केले होते. त्यातच आता आयपीएलची रंगत वाढवण्यासाठी आयपीएलने मोठा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या पुढील सत्रात म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये दोन नव्या संघांची भर पडणार आहे. आज दुबईमध्ये आगामी हंगामात सामिल होणाऱ्या 2 नव्या संघाच्या मालकी हक्काबद्दल लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात आरपीएसजी ग्रुप आणि सीव्हीसी कॅपिटल यांनी दोन नव्या संघावर आपली मोहर लावली आहे.

पुढील वर्षीच्या हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन संघ सामील होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. सीव्हीसी कॅपिटलने 5600 कोटींची बोली लावली आहे. तर दुसरीकडे आरपीएसजी ग्रुपने 7,090 कोटींची बोली लावली आहे. त्यामुळे ही आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली आहेत.

दरम्यान, आयपीएलच्या 15 व्या हंगामात आता 10 संघ पहायला मिळतील. नव्या संघांच्या शर्यतीत अहमदाबाद, पुणे, लखनऊ आणि इंदूर सर्वांत आघाडीवर होते. त्यानंतर आता अहमदाबाद आणि लखनऊ या दोन संघावर मोहर लागली आहे.

थोडक्यात बातम्या-

फाडफाड इंग्रजी शिकायचीय?, मग Google करेल तुमची मदत!

‘माझे वडील हिंदू तर आई मुस्लीम, पण मी…’; मलिकांच्या आरोपावर वानखेडेंचं प्रत्युत्तर

पेट्रोल आणि बिअरची तुलना केल्याने शत्रुघ्न सिन्हा ट्रोल! नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

सुपरस्टार रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; वाचा चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More