नवी दिल्ली | जगभरात मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. त्यामुळं विविध गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. पण मागील काही महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण जगभरात सुरू झाल्यानं कोरोनाचे घातलेले निर्बंध हळूहळू कमी करण्यात येत आहेत. देशात आगामी काळात तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच धर्तीवर केंद्र सरकारकडून बाहेरील देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी यासंदर्भातील नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीनुसार प्रवाशांना 72 तासांपूर्वीचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असणं बंधनकारक असणार आहे. ब्रिटनसह जगातील बहुतांश देशात सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे.
भारतात 11 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर कोरोनाच्या दैनंदिन आकडेवारीत 18 टक्के वाढ आणि संक्रमणामुळं 13 टक्क्यांनी कमी झालं आहे. ही सर्व आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.
दरम्यान, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. यासोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिसून आलेले नाहीत. तसेच आता तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार देशातील कोरोना आकडेवारीत सातत्यानं घट दिसून आलेली आहे.
थोडक्यात बातम्या –
तुमचा लॅपटॉप हॅंग होतोय का? मग वाचा ‘या’ भन्नाट टिप्स
सचिन सावंत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात खळबळ
अखेर रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड!
‘…तर केंद्र सरकार विकावं लागेल’; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं इंधन दरवाढीचं कारण
“सत्तेत असला तरी चुकीचं वागू नका, सर्वांना नियम सारखेच आहेत”
Comments are closed.