बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! कायरन पोलार्ड करणार मुंबईचं नेतृत्व; रोहित, हार्दिक संघाबाहेर

मुंबई | आयपीएल 2021च्या उर्वरित सामन्यांचा थरार आता पुन्हा सुरू झाला आहे. कोरोनामुळे आयपीएलचे सामने रद्द करावे लागले होते. आता पुन्हा आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना सुरूवात झाली आहे. आज पाच वेळची आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात खेळवला जाणार आहे. त्यातच आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अपेक्षेप्रमाणे टाॅससाठी रोहित शर्मा मैदानात येण्याची अपेक्षा होती, मात्र रोहितच्या जागी मुंबईचा अनुभवी खेळाडू कायरन पोलार्ड टाॅससाठी मैदानात आला.चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुखापतीमुळे रोहित शर्मा आयपीएल सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे कायरन पोलार्ड मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर मुंंबईचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यादेखील हा सामना खेळत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अनमोलप्रीत सिंग हा मुंबईकडून पदार्पणाचा सामना खेळत आहे.

दरम्यान, गुणतालिकेत मुंबईचा संघ सध्या दुसऱ्या स्थानी आहे तर चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत झालेल्या 31 सामन्यांमध्ये 19 वेळा मुंबई विजयी झाली आहे. तर 12 वेळा चेन्नईने सामना जिकला आहे.

थोडक्यात बातम्या-

इवेन्ट ख़त्म! 17 सप्टेंबरच्या लसीकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; चरणजीत सिंह चन्नी नवे मुख्यमंत्री

…अन् जयंत पाटलांनी पुर्ण केली ‘त्या’ 6 वर्षाच्या चिमुकल्याची इच्छा

शब्दालय प्रकाशनच्या ‘पुस्तकवारी’ पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन

‘आमची सत्ता आली तर…’; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More