बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! कृष्णेची पाणी पातळी वाढणार; पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज

सांगली | 22 जुलैपासून झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. सातारा, सांगली, कोल्हापूर,रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यात पूराने थैमान घातलं होतं. त्यानंतर आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, पुढील काही दिवसात राज्यात पुन्हा पाऊस पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर सांगलीत देखील येत्या काही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत सांगलीकरांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे. सांगली येथे कृष्णा नदीचा पूर ओसरून पाणी पातळी 40 फुट इतकी सुरक्षित झाली आहे. आता ती आणखी कमी होताना दिसतीये. सध्या कोयना धरणात पाणी साठा 90 टीएमसी असून (78%) धरणातून 30000 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज असून धरणातून पाणी विसर्ग थोडासा वाढवून पाणी साठा कमी केल्यास मोठ्या पावसाच्या कालावधीत विसर्ग नियंत्रित ठेवता येईल. त्यामुळे कोयना धरणातून सद्याचा 30000 विसर्ग थोडासा वाढवून 50000 क्यूसेक करण्याचे नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कृष्णा नदीची पातळी काही प्रमाणात वाढेल, परंतू घाबरण्याचे कारण नाही. मोठा पाऊस जर आला तर तो धरणांतच अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे नागरीकांनी काळजी करू नये,असं आवाहन देखील जयंत पाटलांनी केलं आहे. काल अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते पुन्हा कामाला लागल्याचं दिसतंय.

थोडक्यात बातम्या-

घराबाहेर पडत असाल तर सावधान; पुढील 3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; ठोठावला ‘इतक्या’ लाखांचा दंड

“पेगॅससची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं”

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची हॅट्रिक; उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More