बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसुख हिरेन प्रकरणातील स्फोटकांनी भरलेल्या कारचं लातूर कनेक्शन उघड

लातूर | मनसुख हिरेन प्रकरणात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं 2 जणांना अटक केली आहे. एका जणाला लातूरमधून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केलं असता 21 जूनपर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दोघांनाही कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या पथकानं नव्यानं 2 जणांना अटक केली आहे. संतोष आणि आनंद अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहे. यातील एका जणाला लातूरमधून अटक केले आहे. अटक करण्यात आल्यानंतर दोघांना एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, तेव्हा दोघांनाही 21 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. या दोघांचा या प्रकरणामागे काय हात होता, याचा तपास एनआयए करत आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबद्दल अहवाल समोर आला आहे. मनसुख हिरेन यांच्यावर विषप्रयोग झालेला नाही. मनसुख यांच्या शरीरात कोणतेही विषद्रव्य आढळलं नाही. यामुळे या मृत्यूप्रकरणाचं गूढ अजूनही कायम आहे. मनसुख यांचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत तपास यंत्रणा पुन्हा गोंधळात पडली आहे.

दरम्यान, याधीही शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक खुलासा झाला होता. हिरेन यांचा शवविच्छेदनाचा अहवाल एनआयएच्या अधिकाऱ्यांकडे आला होता. हिरेन यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. त्यांच्या फुफ्फुसामध्ये खाडीतील पाणी आढळलं आहे, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आहे. मात्र, त्यांचा मृत्यू कसा झाले हे मात्र अद्याप समोर येऊ शकलं नाही.

थोडक्यात बातम्या –

‘तू तर अंतर्वस्त्र घालायची विसरली’, बोल्ड लुकमुळे ‘ही’ अभिनेत्री होतेय ट्रोल

शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती म्हणाल्या…

काय सांगता ! WTC फायनलच्या विजेत्या संघाला मिळणार, विराटच्या IPL मानधनापेक्षाही कमी पैसे

“चंद्रकांंत पाटलांची अवस्था ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशी झालीय”

सनी लिओनचा ‘हा’ न्यूड फोटो सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More