मोठी बातमी! राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले, आता मास्क सक्तीही नाही
मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजवला होता. कोरोना संसर्गामुळे लोकांना एकत्र येण्यास बंधने होती. देशात आणि राज्यात अनेक सण आणि उत्सवांवर निर्बंध लादण्यात येत होते. त्यातच आता महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सर्वं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात मास्कचा वापर देखील बंधनकारक असणार नाही. ज्यांना मास्क वापर करायचा असेल त्यांनी मास्कचा वापर करावा. मास्कचा वापर हा ऐच्छिक आहे, असं राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. राज्यात अनेक लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली आहे. त्यामुळे निर्बंध कोरोना निर्बंध हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आज मंत्रिमंडळात कोरोनाचे सर्वं निर्बंध एकमताने उठवण्यात आले आहेत. गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. निर्बंध हटवल्यामुळे राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेबांची जयंती आणि इतर सर्व सण उत्साहात साजरे करता येणार आहेत.
दरम्यान, मास्क लावणं ऐच्छिक असलं तर काळजी घेणं आवश्यक आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राज्यातील पुढील सण उत्साहात साजरे करता येणार आहेत, असं राजेश टोपे म्हणाले आहेत. तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध हटवल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
थोडक्यात बातम्या-
“तुमचे निर्बंध घाला चुलीत, हिंदू सणांवर बंधनं लादू नका”
नवाब मलिकांचं टेन्शन वाढलं! आता ईडीचं पथक नाशकात धडकलं, चौकशी सुरू
महागाईवर प्रश्न विचारताच बाबा रामदेव भडकले, व्हिडीओ व्हायरल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर नाराजी, शरद पवारांकडे केली तक्रार?
आर्थिक कोंडी फोडण्यासाठी रशियाने भारताला दिली ‘ही’ खास ऑफर
Comments are closed.