बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! नीरज चोप्रासह अन्य 11 खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

नवी दिल्ली | देशातील खेळामध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. टोकियो ऑलिम्पिक 2021च्या स्पर्धेमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची यावर्षीच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारसाठी शिफारस करण्यात आली आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा खेळातील सर्वोच्च मोठा पुरस्कार आहे.

नीरज व्यतिरिक्त टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये चमकलेल्या इतर काही खेळाडूंसह भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्रीसह अन्य 10 खेळाडूंचा खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

नीरज चोप्रा व्यतिरिक्त मिताली राज, सुनिल छेत्री, कुस्तीपटू रवी दहिया, लव्हलिना बोर्गोहेन, पी. आर. श्रीजेश, प्रमोद भगत, सुमित अंतिल, अवनी लखेरा, एम.कृष्णा नागर, एम.नारवाल यांची देखील क्रिडा समितीकडून शिफारस करण्यात आली आहे. तसेच शिखर धवनसह अन्य 35 खेळाडूंचा अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

दरम्यान, नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2021 च्या स्पर्धेत सुवर्णपदला गवसणी घातली आहे. नीरज चोप्रा हा वैयक्तिकरित्या सुवर्णपदक जिंकणारा दुसरा खेळाडू आहे. सुवर्णपदक जिंकल्यापासून त्याचं खेलरत्न पुरस्कारासाठी नाव निश्चित झालं होतं. तसेच रवीकुमार दहियाने सुद्धा चांगली कामगिरी या वर्षीच्या ऑलिम्पिक 2021 च्या स्पर्धेत केली आहे.

थोडक्यात बातम्या –

“नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेलेत, त्यांना राजीनामा द्यावाच लागेल”

“पेगासस प्रकरणाची ऑर्डर पंतप्रधान मोदींनी किंवा गृहमंत्र्यांनी दिली”

“अनिल देशमुख कुठं आहेत याचं उत्तर शरद पवारांनी द्यावं”

एमपीएससीची मोठी घोषणा! PSI, STI, ASO मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर

“त्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया होता, सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More