बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मनमोहन सिंग यांना डेंग्यूची लागण, प्रकृतीबाबत आली ‘ही’ माहिती समोर

नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावली आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  

सध्या सोशल मीडियावर मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरल्याचं दिसून येत आहे. मात्र एम्स रूग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मनमोहन सिंह यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. तरी कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन एम्स रूग्णालयाकडून करण्यात आलं आहे.

मनमोहन सिंह यांच्या प्लेटलेटची संख्या आता वाढत आहे. त्यांना कार्डिओ न्युरो सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर डॉ. नितीश नाईक आणि त्यांची टीम उपचार करत आहेत. त्यामुळे मनमोहन सिंग यांची प्रकृती लवकर ठिक व्हावी, अशी प्रार्थना आता अनेक लोक करताना दिसत आहेत.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भेट घेतली आहे. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील त्यांची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली आहे.

थोडक्यात बातम्या –

“तुमच्या हिंदुत्वाचा बुरखा फाटका, राज्याला संकुचित मनोवृत्तीचा मुख्यमंत्री लाभला”

धोनी म्हणतो,”मी पुन्हा येईल…, मी कुठं आयपीएल सोडलंय”

ना रोहित ना विराट, बाबर आझम म्हणतो ‘हा’ खेळाडू वर्ल्ड कपमध्ये धमाका करेल

‘अजित पवारांना मुख्यमंत्री करणार का?’, शरद पवार म्हणतात…

“राज ठाकरे आणि नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर का पडावं लागलं?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More