बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी ! लोटे एमआयडीसीत पुन्हा भीषण आग, कोट्यावधींचं नुकसान

रत्नागिरी | रत्नागिरीमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसी (Lote MIDC)येथील प्लॉट नंबर 39 येथील प्रिवी ऑर्गानिक्स लिमिटेड कंपनीला भीषण आग (Fire)लागली. या भीषण आगीमुळे सगळीकडे एकच खळळ उडालेली आहे. या आगीत मोठं नुकसान झाल्याचं समजत आहे.

रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्नागिरीतील लोटे एमआयडीसी येथील प्लॉट नंबर 39 येथील प्रिवी ऑर्गानिक्स लिमिटेड कंपनीला भीषण आग लागली. कंपनीत सहा ते सात स्फोट झाले आणि भीषण आग लागली. तब्बल दहा किलोमीटर लांबून आगीच्या धुराचे लोट दिसून येत होते. यामुळे नागरिकही घाबरुन गेले.

कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे कोट्यावधींचं नुकसान झालं. सुदैवानं या अपघातात कोणाचाही जीव गेला नाही. कंपनीतील सॉल्व्हंट केमिकलच्या ड्रम ठेवलेल्या विभागांमध्ये आग लागली आणि स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. यापूर्वीही याठिकाणी असे अपघात घडले आहेत. त्यामुळे नागरिकांध्ये भीती भरली आहे.

दरम्यान, आग लागल्याचं समजताच अग्निशामक दलाला बोलण्यात आलं. ब्बल चार तासांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोल्हापूरच्या निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

रशियाकडून युक्रेनच्या 8 शहरांवर हल्ला, ‘इतके’ हजार नागरिक बंदी करण्यात आले

उन्हाळ्यात आजारांपासून वाचण्यासाठी ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी, वाचा सविस्तर

अभिनेता सिद्धार्थची पोस्ट चर्चेत; लाडक्या लेकींसोबत फोटो शेअर करत म्हणाला…

स्टाॅयनिसने खेचला 104 मीटर सिक्स, अन् गर्लफ्रेंडला इशारा करत…; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More