बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी ! टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण आग, अनेकजण जखमी

रांची | झारखंडमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. झारखंडमधील जमशेदमपूर येथील टाटा स्टीलच्या कोक प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची दुर्घटना समोर आली आहे. या भीषण आगीमुळे सगळीकडे एकच खळळ उडालेली आहे. या आगीत मोठं नुकसान झाल्याचं समजत आहे.

सकाळी साडे दहाच्या सुमारास कंपनीत लागलेल्या आगीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

या दुर्घटनेविषयी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट केलेलं पहायला मिळालं. जमशेदपूरमधील टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोट झाला आहे. टाटा स्टील व्यवस्थापनाच्या समन्वयाने जिल्हा प्रशासन जखमींवर तात्काळ उपचारासाठी कार्यवाही करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, कंपनीतील गॅस लीक झाल्यावर हा स्फोट घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सध्या परिसरात भीतीचं वातावरण पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी ! KGF फेम अभिनेत्याचं निधन, 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

“ओबीसी आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे लागलंय”

जेवण महागणार! गॅस तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागला

‘महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या…’; फडणवीसांचा गंभीर आरोप

“राज्यात भोंग्याचं नाही तर भोंगळं राजकारण सुरू आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More