बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शिवसेना आमदार संजय रायमुलकरांनी ‘या’ कारणाने घेतली धरणात उडी; पाहा व्हिडीओ

बुलडाणा | पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे. या कालव्यातील पाणी मोठ्या प्रमाणात पाझरत आहे. यामुळे जमिनी नापीक होत चालल्या आहेत. प्रशासनाला याची माहिती देऊन देखील प्रशासन याची दखल घेत नसल्याने आमदार संजय रायमुलकर यांनी आज आंदोलन केलं होतं.

पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यातच रायमुलकर यांनी आंदोलन सुरू केलं होतं. यावेळी रायमुलकर यांच्यासोबत परिसरातील अनेक शेतकरी देखील होते. बराच वेळ आंदोलन करून देखील प्रशासनाने याची दखल घेतली नाही. यामुळे रायमुलकर यांनी धरणाच्या पाण्यात उडी घेतली.

सकाळी 11च्या सुमारास आमदार रायमुलकर पाण्यात उतरले होते. मात्र, आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने त्यांनी पाण्यात उडी घेतली. यावेळी रामा अत्तरकर व पोलीस कर्मचारी काशीरकर यांनी त्यांना वाचवले. यानंतर खासदार प्रतापराव जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी यावेळी सर्व अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याचं आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर रायमुलकर यांनी आंदोलन मागे घेतलं आहे.

दरम्यान, पेनटाकळी धरणाच्या कालव्याला ठिकठिकाणी भगदाड पडले आहेत. यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून परिसरातील शेतकरी प्रशासनाकडे मागणी करत होते. याच मागणीचा पाठपुरावा आमदार संजय रायमुलकर आणि खासदार प्रतापराव जाधव पाठपुरावा करत होते. मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने रायमुलकर यांनी आंदोलन केले आहे.

पाहा व्हिडिओ

थोडक्यात बातम्या – 

“महाराष्ट्र सरकारने पळवाट न काढता निदान 15 दिवस तरी अधिवेशन बोलवावं”

सोनिया गांधी ॲक्शन मोडमध्ये, बोलावली महत्वाची बैठक; ‘या’ गोष्टींवर होणार चर्चा?

अखेर प्रतिक्षा संपली! ‘बिग बाॅस मराठी 3’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘झाडे लावा आणि जास्त मार्क मिळवा’, ‘या’ ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुरु केली अनोखी योजना

काय सांगता! आता केवळ आवाजाने चार्ज होणार MIचा स्मार्टफोन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More