बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजारी असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचं लक्ष कृष्णकुंजवर लागून होतं. अशातच आता राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना सौम्य ताप आल्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी चाचणीची रिपोर्ट आला.

शुक्रवारी आलेल्या रिपोर्टनंतर राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.

दरम्यान, एका पत्रकाराने त्यांना तुम्ही मास्क का घातला नाही, असा प्रश्न विचारला होता. यावर राज ठाकरेंनी त्यांच्या अनोख्या अंदाजात, तुम्ही सर्वांनी मास्क घातला म्हणून मी मास्क घालतच नाही, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्र तुळशीचे वृंदावन आहे, इथं गांज्या आणि भांग पिकवू नका”

“एक मंत्री सकाळ संध्याकाळ कुठली तरी तंबाखू घेतल्यासारखं बोलतोय”

‘आज गोपीनाथराव असते तर त्यांनी…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा

‘बाळासाहेब थोरातांनी जाहीरपणे सांगावं की त्यांनी…’; विखे पाटलांचं थोरातांना आव्हान

भारताविरूद्ध पाकिस्तानचे ‘हे’ 11 खेळाडू मैदानात उतरणार; पाकिस्तानचा संघ जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More