बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! समीर वानखेडे यांना मुंबई पोलिसांचं समन्स; ‘या’ प्रकरणात चौकशी होणार

मुंबई | आपल्या राज्यात सध्या एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे नाव प्रसिद्ध झालं आहे. मुंबईच्या एका क्रुझवर कारवाई केल्याप्रकरणी समीर वानखेडे प्रकाशझोतात आले होते. समीर वानखेडे यांच्यावर खोटी कारवाई केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली होती. आता मुंबई पोलिसांनी वानखेडे यांना समन्स पाठवल्याची माहीती समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडं माझ्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार दाखल केली होती. वानखेडे यांच्या याच तक्रारीची दखल घेत मुंबई पोलीस वानखेडे यांना नोटीस पाठवणार आहेत. ड्रग्ज प्रकरणात कारवाई केल्यावर या प्रकरणात अनेक नवीन खुलासे झाले होते. या प्रकरणाला राजकीय रंग आल्यानं समीर वानखेडे नाव राज्यभर पोहचलं आहे.

11 ऑक्टोबर रोजी काही पोलिसांनी माझ्यावर पाळत ठेवल्याची तक्रार समीर वानखेडे यांनी केली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासलं आहे. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी दोन पोलिसांची चौकशी देखील केली होती. समीर वानखेडे यांनी संबंधित प्रकरणाचे काही पुरावे मुंबई पोलिसांना दिले होते. परिणामी आता समीर वानखेडे यांची चौकशी होणार आहे.

दरम्यान, एनसीबीच्या कारवाईत सिनेअभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मुद्दाम अटक करण्यात आल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. आता मुंबई पोलीस समीर वानखेडे प्रकरणात काय भूमिका घेणार याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या 

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

“भारतीय नागरिक आरएसएसमुळेच सुरक्षित, त्यांच्यामुळे देशाला शांती लाभली”

मोठी बातमी! अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या सुरक्षेत मोठी वाढ

“बाटला हाऊसमध्ये त्यावेळी जे काही झालं, त्यानंतर सोनिया गांधी…”

“ऐट राजाची आणि वागणूक भिकाऱ्याची, अशी ठाकरे सरकारची अवस्था”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More