बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! नारायण राणेंना बसला वीजेचा शॅाक

सिंधुदुर्ग | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पोलिसांनी ज्या तत्परतेने कारवाई केली, त्यामुळे नारायण राणे यांना शाॅक लागला होता. राणे यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर दोन दिवसांनी राणेंनी पुन्हा आपल्या जनआशीर्वीद यात्रेला सुरूवात केली आहे. सध्या राणे आपल्या जनआशीर्वीद यात्रेसाठी सिंधुदुर्गात आहेत. त्यावेळी नारायण राणे यांना खराखुरा वीजेचा शाॅक लागल्याची घडना घडली.

शुक्रवारी कणकवलीच्या शिवाजी चौकात नारायण राणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नारायण राणे गेले होते. नारायण राणे येणार असल्यानं त्याठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मात्र, पुतळ्याजवळ जात असताना रेलिंगला लावण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचा राणे यांना शॉक लागला.

शाॅक लागताच त्यांनी तात्काळ हात मागे घेतला. सुदैवानं राणेंना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. त्यावेळी राणे यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर देखील होते. राणेंंना शाॅक लागल्याचा व्हिडीओ काॅमेऱ्यात कैद झाला आहे.  त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरूवात केली.

दरम्यान, नारायण राणे यांनी शुक्रवारी कणकलीमध्ये जनआशीर्वीद यात्रा काढली. राणे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. अनेकांनी हार घालून त्यांचं स्वागत केलं. मात्र, जनआशीर्वाद यात्रेवेळी अनेकांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचं दिसून आलं.

थोडक्यात बातम्या-

“मी ठाकरे… माझ्या डीएनएमध्ये राजकारण आहे हे त्यांनी दाखवून दिलंय”

‘हा पठ्ठ्या बघा…’; भर कार्यक्रमात अजित पवारांची टोलेबाजी

राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

महापालिका जिंकायचीच, संजय राऊतांनी टाकलं पहिलं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More