बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी ! नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मुंबई | मंत्री नवाब मलिकांवर(Nawab Malik) झालेल्या ईडी (Ed) कारवाईनंतर विरोधकांनी मलिकांना चांगलंच निशाण्यावर घेतलं जात आहे. त्यामुळे मलिकांवरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप होत होत असलेले पहायला मिळतात. अशातच आता नवाब मलिकांविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नवाब मलिकांची प्रकृती खालावली असल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांना उपचारासाठी स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरुन राजकीय वर्तुळातील वातावरण जोरदार पेटलं आहे. त्यामुळे सध्या मलिकांची खाती काढून घेतली आहेत. नवाब मलिक यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. मनी लाॅर्डिंग प्रकरणात त्यांना ही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही मलिकांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर नवाब मलिकांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

थोडक्यात बातम्या – 

औरंगाबादमधल्या गर्जनेनंतर राज ठाकरेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…

लसीकरणाविषयी सुप्रीम कोर्टानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

‘महाराष्ट्रात हुकुमशाही चालणार नाही’; अजित पवारांचा गंभीर इशारा

मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अमृता फडणवीसांचा पलटवार, म्हणाल्या…

राज ठाकरेंवर कारवाई होणार?, गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More