मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीनं अटक केली आहे. त्यांच्या अटकेनं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालेली पहायला मिळाली. अशातच आता ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांची प्रकृती ढासळल्याचं समोर आलं आहे.
नवाब मलिक यांना सात दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवण्यात आलं आहे. अशातच नवाब मलिकांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे सध्या त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक आणि ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, तब्बल 8 तास मलिक यांची चौकशी झाली आणि अखेर त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे याचे पडसाद संपूर्ण राज्यात पहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
“सत्ता गेल्यापासून भाजपच्या बुडाला आग लागलीये”
बापाचं काळीज ते, लेकीला निरोप देताना युक्रेनमधील बाप धायमोकळून रडला, पाहा व्हिडीओ
“तुमचे लोक धुतल्या तांदळासारखे आहेत का?, रोज गंगेत स्नान करुन पाप करतात”
युक्रेनमधील सायकलस्वारावर पडला रशियाचा बॉम्ब, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर
मोठी बातमी! नवाब मलिकांनंतर शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई
Comments are closed.