बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! चालू कार्यक्रमात अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका

अकोला | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदर अमोल मिटकरी रविवारी हिंगणा येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमात बोलत असताना मिटकरी यांना अचानक अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. यानंतर मिटकरी यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असूून सध्या त्यांची प्रकृती स्थीर आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य कला चित्रपट विभागाच्या विदर्भ अध्यक्षा महागायिका वैशाली माडे काल अकोला दौऱ्यावर होत्या. पक्षाच्या वतीने वैशाली माडे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अमोल मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर काही नेते देखील उपस्थित होते.

अमोल मिटकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या मनाची होतीया काहीली’ ही छक्कड गायला सुरुवात केली. मात्र, काही क्षणातंच मिटकरी यांचे तोंड वाकडे होऊ लागले, आवजामध्ये बदल होऊ लागला. मिटकरी यांच्या प्रकृतीत झालेला बदल उपस्थितांच्या लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने मिटकरी यांना आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

दरम्यान, सध्या मिटकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. चिंता करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही, असं मिटकरी यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तसेच आपले जीव धोक्यात घालून भेटायला येवू नये, अशी विनंती देखील मिटकरी यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘उद्धव ठाकरे आणि अजित पवार माझ्यावर पाळत ठेवत आहेत’; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

नितेश राणेंच्या जुळवून घेण्याच्या वक्तव्यावर शिवसेनेने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

“दैनिक सामनाचा संजय राऊत स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर करत आहेत”

‘योगी आदित्यनाथ आम्हाला देता का?’; ऑस्ट्रेलियाच्या खासदाराकडून योगींचं कौतुक

“…ही तर शहिद तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय कामगिरीची अवहेलना”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More