बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ‘या’ राज्यात 5 जुलैपर्यंत नाईट कर्फ्यू, मुख्यमंत्र्यांची घोषणा

पणजी | देशात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवलेला पाहायला मिळत आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील काही राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र देखील पाहायला मिळत आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकच राज्याचे सरकार कसोटीने प्रयत्न करत आहेत. गोव्याच्या सरकारने देखील कोरोनाला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू लागू केला होता.

आता हा नाईट कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. 5 जुलैपर्यंत गोव्यात नाईट कर्फ्यू वाढवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोव्यात देखील अलिकडे काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.

दरम्यान, आज गोव्यात 222 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 277 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात गोव्यात 5 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

गोव्यात आतापर्यंत 1 लाख 65 हजार 648 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1 लाख 59 हजार 954 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या गोव्यात 2 हजार 667 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

थोडक्यात बातम्या – 

जेवणात मटण नाही म्हणून नवरदेव पसार अन्…

राष्ट्रपतींचा दौरा दोघांच्या जिवावर बेतला! 3 वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेने प्राण गमावले

ह्रदयद्रावक! दीड फुटांची सळई छातीतून आरपार गेलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

मोदी सरकार विरोधात तिसरी आघाडी स्थापन होणार? राऊतांनी दिली आतली बातमी

कोरोनाकाळात कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेत बँकिंग सेक्टरला मात्र अच्छे दिन; नफ्यात दुपटीने वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More