मोठी बातमी! आता ‘या’ नागरिकांना मिळणार नाही रेशन

नवी दिल्ली | सरकारकडून देशातील गरजू लोकांना रेशन मार्फत(Ration Card) अतिशय कमी किमतीत धान्य दिले जाते. या रेशन योजनेचा फायदा देशातील ऐंशी कोटींहून अधिक लोक घेतात. आता रेशन घेणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे.

या योजनेनुसार नागरिकांना महिन्याला गहू, तांदूळ तसेच तेल कमी किमतीत दिले जाते. परंतु या योजनेचा फायदा घेण्यासाठी सरकराचे काही नियम आहेत. मात्र काहीजण या नियमांत बसत नसतानाही रेशन मिळवत असल्याचं लक्षात आलं आहे.

या अपात्र लोकांसाठी आता सरकारनं कडक कारवाई सुरू करण्यास सुरवात केली आहे. अपात्र लोकांची यादी लवकरच शिधा वाटप विक्रेत्यांना दिली जाणार आहे. अपात्र लोकांकडून वसुलीही केली जाईल, अशाही चर्चा आहेत.

काहीजण रेशनचे धान्य घेऊन दुसऱ्यांना जास्त किमतीत विकत होते, अशी माहितीही समोर आली आहे. असं करणाऱ्या लोकांची नावेही हटवली जाणार आहेत.

अपात्र असताना रेशन मिळवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील लोकांची संख्या अधिक आहे. या लोकांची कार्डे आता रद्द केली जाऊ शकतात.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) कोरोनाच्या काळात 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. या योजनेची मुदतही आता संपली आहे.

महत्वाच्या बातम्या-